Ad will apear here
Next
रोवा वाहतूक सेवेची मुहूर्तमेढ
दोस्तांनो, सध्या खूप शिकूनही मनासारखी नोकरी मिळत नाही. एखादी नोकरी मिळालीच तर पगार कमी असतो. अशा वेळी स्वत:चा एखादा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना वाईट नाही. अशा एका व्यवसायाविषयी...
.....
सध्या ट्रॅव्हल अँड टुरिझमला चांगले दिवस आले आहेत. व्यावसायिक कारणांमुळे प्रवास करणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे वाहतूक सेवा क्षेत्र आज वेगाने विस्तारत आहे. या क्षेत्रात अनेक कंपन्याही आल्या आहेत. त्यांच्या मदतीने किंवा स्वतंत्रपणे तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

सध्या लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी गाडी लागते. सहलींसाठीही गाड्यांची गरज असते. त्यामुळे तुमच्याकडे गाडी असेल, तुम्ही वाहन चालवू शकत असाल तर तुम्हाला स्वतःला एकट्यानेच हा व्यवसाय सुरू करता येईल.

 कर्ज घेऊन एखादी गाडी घेऊन या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवू शकता. ओला, उबेरसारख्या कंपन्याही संधी देत आहेत. या माध्यमातून तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवू शकता. या व्यवसायात जम बसला की, आणखी गाड्या घेऊन व्यवसाय वाढवू शकता. 
 
अर्थात, उद्योग-व्यवसायाची सुरुवात करताना संघर्ष करण्याची तयारी ठेवायला हवी. कारण लगेच यश मिळतेच असे नाही; पण एकदा यश मिळाल्यावर तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवू शकता.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZDSCH
Similar Posts
७० लाखांचे पॅकेज नाकारून इलेक्ट्रिक वाहनांची कंपनी सुरू करणारा जिगरबाज अली उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असते. लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर सहसा कोणी नाकारत नाही; पण दिल्लीच्या मोहम्मद आमिर अली या जिगरबाज तरुणाने थोड्याथोडक्या नाही, तर ७० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी नाकारली आणि भारतात राहून देशासाठी काही तरी करण्याच्या इच्छेने इलेक्ट्रिक वाहने बनवणारी स्वतःची कंपनी सुरू केली
‘टाटा प्रोजेक्ट्स’ला आयआयटी संस्थांमध्ये उदंड प्रतिसाद मुंबई : टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व सर्वांत प्रशंसाप्राप्त संरचना कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने या वर्षी दिल्ली, मुंबई, मद्रास, कानपूर आणि खरगपूर या भारतातील आघाडीच्या पाच आयआयटी संस्थांमधून ५० इंजिनीअर्सची नियुक्ती केली आहे.
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या
जाहिरात उद्योगाची आई भारतीय जाहिरात उद्योगाची आई अशी ओळख असलेल्या जाहिरात गुरू तारा सिन्हा यांचे अलिकडेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language